शिक्षक
एक चांगले शिक्षक विद्यार्थ्यांना
विश्वदर्शन घडवितात,
हे काही असंच नाहीत म्हणत.
कारण विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील खरे जादूगर तुम्हीच असता.
उजळून टाकतात तुम्ही दीपमाळ ज्ञानाची,
वाट दाखवता यशाच्या शिखराची,
जेव्हा थाप पडते तुमची प्रेरणेची,
आवड लागते मग खूप शिकण्याची,
तुम्ही ओळख करून देता अक्षरांची,
तुम्हीच पारख देता वाईट चांगल्याची.
तुमच्या शिकवणीतुन यशस्वी तर, आम्ही होतो
पण सगळ्यात जास्त आनंद तुम्हालाच वाटतो.
तुम्हीच शिल्पकार आमच्या व्यक्तिमत्वाचे,
कारण धडे देता तुम्ही अभिमानास्पद कर्तुत्वाचे,
आणि पंखांना बळही देता गगन भरारीचे,
अनंत प्रणाम हे तुझ ज्ञानाच्या देवता,
आयुष्याच्या क्षितिजापर्यंत कायम रहावी सोबत
आणि ओंजळ आमुची, सदा राहो सुगंधी फुलांनी बहरत.
Comments
Post a Comment