संघर्ष शेतकरी राजाचा

भलेही वाहून गेली स्वप्न माझे 
पडतो आहे लढतो आहे,
नव्या आशेने उठतो आहे...
येऊदेत लाखो तुफान,
की संकट ही पुराचे.....
मिळो ना मिळो कोणाची मदत,
पुन्हा शेत बहरेल संघर्ष करत.....

आश्वासने नाहीत रे कामी येत माझ्या,
हे करु ते करु म्हणायचे.....
डोळे भरून आले माझे 
खड्डे पडलेले शेत पाहून.....
तोंडाला आलेला घास,
शेती पिकवतान आलेला घाम,
आणि आता नुकसानीचे वाहणारे अश्रूही
पावसाने  सारं नेलं वाहून....
नुकसान तर दिसेल किंवा नाहीं,
पन कष्ट मात्र आता दिसणार नाहीत
तुमच्या पंचनाम्यात .....

कृषिप्रधान म्हणवणाऱ्या देशात...
आशी दुर्दशा नाहीं पाहवत....
हे काळीआई मागणच समज माझ
पाठिंबा सतत राहूदे प्रयत्नांना,
घास द्यायचा आहे मला सगळ्यांना......
कारण हरलो तर नाहीच अजून मी ....
भलेही वाहून गेली स्वप्न माझे 
पडतो आहे लढतो आहे,
नव्या आशेने उठतो आहे...

Comments